गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजार वधारला 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

 आज (सोमवार) दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 161.57 अंशांनी वधारून 33 हजार 788 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 47.75 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी 10 हजार 379 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. 

मुंबई: शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवण्यात आली. आज (सोमवार) दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 161.57 अंशांनी वधारून 33 हजार 788 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 47.75 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी 10 हजार 379 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. 

येत्या आठवड्यात काही दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस येत्या आठवड्यात जानेवारी ते मार्च कालावधीचे तिमाही निकाल जाहीर करणार आहे.  कंपन्यांचे निकाल सकारात्मक राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.   गुंतवणूकदारांमध्ये आज खरेदीचा उत्साह दिसून आला. क्षेत्रीय पातळीवर  बँकिंग, एफएमसीजी, कंझ्युमर ड्यूरेबल्स, कॅपिटल गुड्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु होती. मात्र आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली. 

आज मुंबई शेअर बाजारात बीपीसीएल, एचपीसीएल, हिंडाल्को, आयओसी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, इंडसइंड बँक आणि एचयूएल यांच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 3.8-1.2 टक्क्यांची वाढ झाली. तर  टाटा मोटर्स, डीव्हीआर, लुपिन, टाटा मोटर्स, इन्फोसिस, वेदांता, भारती एअरटेल आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये 2.2-1 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. 

Web Title: Sensex Rises For Third Day In A Row