सेन्सेक्समधील तेजी कायम; निफ्टी 8450 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई: आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज(बुधवार) भारतीय शेअर बाजारात तेजीसह व्यवहार सुरु आहे. सेन्सेक्स सुमारे 150 अंशांपर्यंत वधारला होता तर निफ्टीने 8450 अंशांची पातळी गाठली होती. सध्या(11 वाजून 30 मिनिटे) सेन्सेक्स 143.45 अंशांच्या वाढीसह 27,379.11 पातळीवर व्यवहार करत आहे. यादरम्यान, निफ्टी 49.60 अंशांच्या वाढीसह 8,447.60 पातळीवर व्यवहार करत आहे.

ऑईल अँड गॅस क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार सुरु आहे. प्रामुख्याने बँकिंग आणि मेटल क्षेत्रात विशेष तेजी निर्माण झाली आहे. निफ्टीवर भेल, एचयुएल, टाटा स्टील, ग्रासिम आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर भारती एअरटेल, बीपीसीएल, एनटीपीसी, गेल आणि डॉ. रेड्डीज् लॅब्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Sensex still on the rise; Nifty crosses 8450 high