सेन्सेक्‍स, निफ्टीची जोरदार आगेकूच सुरूच 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला. 

मुंबई, ता. 23 (पीटीआय) ः शेअर बाजारातील तेजीची मालिका सलग दुसऱ्या सत्रात सोमवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1 हजार 75 अंशांची उसळी घेऊन 39 हजार 90 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 326 अंशांची वाढ होऊन 11 हजार 600 अंशांवर बंद झाला. 

सेन्सेक्‍सच्या मंचावर बजाज फायनान्स, एल अँड टी, एशियन पेंट्‌स, आयटीसी, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, मारूती आणि एसबीआय यांच्या समभागात 8.70 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. याच वेळी इन्फोसिस, आरआयएल, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक यांच्या समभागात 4.97 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

केंद्र सरकारने कंपनी करात केलेल्या कपातीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेले तेजीचे वातावरण कायम आहे. सरकारने शुक्रवारी (ता. 20) घेतलेल्या या निर्णयामुळे त्यावेळी सेन्सेक्‍सने 1 हजार 921 अंश आणि निफ्टीने 569 अंशांची झेप घेतली होती. ही सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये मागील दशकभरामध्ये एकाच दिवसात झालेली सर्वाधिक वाढ ठरली होती. मागील सत्रातील तेजीत शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल 6.82 लाख कोटी रुपयांनी वाढून गुंतवणूकदार मालामाल झाले होते. मागील दोन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये 2 हजार 996 अंश तर, निफ्टीत 895 अंशांची वाढ झाली आहे. 

दरम्यान, मागील सत्रात परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 35 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले तर, देशांर्तगत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3 हजार 1 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. 

जागतिक पातळीवर संमिश्र वातावरण 
जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्ये आज संमिश्र वातावरण दिसून आले. आशियातील हॅंगसेंग, शांघाय कम्पोझिट इंडेक्‍स हे किरकोळ वधारले तर, निक्केई आणि कोस्पीमध्ये घसरण नोंदविण्यात आली. युरोपमधील शेअर बाजारांमध्ये आजच्या सत्राच्य सुरवातीला घसरणीचे वातावरण होते. 

दोन सत्रांतील वाढ 
सेन्सेक्‍स ः 2,996 अंश 
निफ्टी ः 895 अंश 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex surges over 1000 points regains 39000