सेन्सेक्स 600 अंशांनी घसरला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 605 अंशांची घसरण झाली असून 35 हजार 300.90 अंशावर व्यवहार करतो आहे. सेन्सेक्समधील घसरण वाढत चालली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 170 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 10 हजार 852 अंशांवर व्यवहार करतो आहे.

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात उमटले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 605 अंशांची घसरण झाली असून 35 हजार 300.90 अंशावर व्यवहार करतो आहे. सेन्सेक्समधील घसरण वाढत चालली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 170 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 10 हजार 852 अंशांवर व्यवहार करतो आहे.

शेअर बाजारातील विश्लेषकांच्या मते, अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात कोणत्या कंपनीच्या अथवा कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात ऑरो फार्मा, टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा आणि एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर बजाज फायनान्स, मारुती, एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली आहे.

Web Title: Sensex tanks nearly 600 points