सेन्सेक्‍सची उच्चांकी पातळीवर झेप

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - रुपया वधारल्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढल्याने शेअर बाजारात गुरुवारी तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१२ अंशांनी वाढून ३४ हजार ७१३ अंश या तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४२ अंशांनी वधारून १० हजार ६१७ अंशांवर बंद झाला. 

सेन्सेक्‍समध्ये आज सकाळपासून वाढ होण्यास सुरवात झाली. तो कालच्या तुलनेत २१२ अंशांनी  वाढून ३४ हजार ७१७ अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची ५ फेब्रुवारीनंतरची उच्चांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक ३४ हजार ७५७ अंशांवर बंद झाला होता. 

एफएमसीजी, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज खरेदीचा जोर राहिला. 

येस बॅंक तेजीत 
येस बॅंकेला मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत १ हजार १७९ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. येस बॅंकेच्या नफ्यात चौथ्या तिमाहीमध्ये २९ टक्के वाढ झाल्याने बॅंकेच्या समभागात आज सर्वाधिक ८.२६ टक्के वाढ झाली. यामुळे आज बॅंकेचे बाजारमूल्य ६ हजार १८३ कोटी रुपयांनी वाढून ते ८१ हजार ७५ कोटी रुपयांवर पोचले. एप्रिलमधील वायदे व्यवहार पूर्ती आणि येस बॅंकेच्या नफ्यात झालेली वाढ यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर आज वाढला.

सेन्सेक्‍सची पातळी

5 फेब्रुवारी : ३४,७५७ 
26 एप्रिल : ३४,७१७

Web Title: Sensex ups