जागतिक तेजीने सेन्सेक्‍स वधारला 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - जागतिक पातळीवरील तेजीमुळे शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १६५ अंशांनी वाढून ३४ हजार ६१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २९ अंशांनी वधारून १० हजार ६१४ अंशांवर बंद झाला. 

रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला खरेदीचा जोर आणि कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागल्याने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्‍समध्ये १६५ अंशांची वाढ होऊन तो ३४ हजार ६१६ अंशांवर बंद झाला. काल निर्देशांकात ३५ अंशांची वाढ झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात आज सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल येस बॅंक, एम ॲण्ड एम, अदानी स्पोर्टस, आयसीआयसीआय बॅंक, एल ॲण्ड टी, एचडीएफसी, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज आणि ओएनजीसी यांच्या समभागात वाढ झाली. धातू, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात मात्र, आज घसरण नोंदविण्यात आली.

कच्च्या तेलाचा भाव 75 डॉलरवर 
जागतिक पातळीवर मंगळवारी कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल ७५ डॉलरच्या पुढे गेला. हा तेलाच्या भावातील नोव्हेंबर २०१४ पासूनचा उच्चांक आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत असताना मागणी विक्रमी पातळीवर पोचल्याने भावात वाढ होत आहे. यामुळे जागतिक आणि आशियाई शेअर बाजारात तेजी निर्माण झाली.

Web Title: Sensex uptrend on global cues