'सेबी' अध्यक्षपदाच्या शर्यतीत शक्तिकांत दास आघाडीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

 नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक मंडळ 'सेबी'च्या अध्यक्षाचा शोध सुरू झाला असून, या पदासाठी अर्थसचिव शक्तिकांत दास यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, वीज मंत्रालय सचिव पीके पुजारी आणि अर्थ मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अजय त्यागी यांच्यादेखील नावाचा विचार सुरु आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.  

मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यु.के. सिन्हा यांचा कार्यकाळ पुढील वर्षी मार्च महिन्यात संपणार आहे. नव्या अध्यक्षांचा शोध सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाला असून सरकारकडे अनेक अर्ज सादर झाले आहेत. 

केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये सहभागी असणारे अर्थसचिव शक्तिकांत दास हे 'सेबी'च्या बोर्डावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ते रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावरदेखील कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी अजय त्यागी हेदेखील काही काळ रिझर्व्ह बँकेच्या बोर्डावर कार्यरत होते. वीज मंत्रालय सचिव पी.के. पुजारी यांनीदेखील कृषि व अर्थ मंत्रालयात विविध भूमिका पार पाडल्या आहेत. 
 
Web Title: Shaktikanta Das, two other top bureaucrats in race for Sebi chief post