शंकरा बिल्डप्रोचा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

नवी दिल्ली: : होम इम्प्रोव्हमेंट अँड बिल्डिंग प्रोडक्ट्स क्षेत्रातील कंपनी शंकरा बिल्डप्रोच्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) आज सुरुवात झाली आहे. 24 मार्च रोजी संपणाऱ्या हिस्साविक्रीतून कंपनी 350 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. यासाठी प्रतिशेअर 440 रुपये ते 460 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, कंपनीने प्रमुख गुंतवणूकदारांना शेअरविक्री करुन 103.5 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. कंपनीने एकुण 16 गुंतवणूकदारांना 22.50 लाख शेअर्सचे वाटप केले आहे. प्रतिशेअर 460 रुपयांप्रमाणे ही विक्री करण्यात आली आहे. फ्रँकलिंग इंडिया स्मॉलर कंपनीज् फंड, डीएसपी ब्लॅकरॉक कोअर फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने शंकरा बिल्डींगध्ये गुंतवणूक केली आहे.

आयपीओ योजनेअंतर्गत, कंपनी सुमारे 45 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, प्रवर्तक सुकुमार श्रीनिवास आणि फेअरविंड्स ट्रस्टीज् सर्व्हिसेसच्या शेअर्सची विक्री करण्यासाठी 'ऑफर फॉर सेल' आयोजित केला जाणार आहे. गुंतवणूकदारांकरिता कंपनीचा आयपीओ खरेदीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च आहे.

Web Title: Shankara Building Products to raise up to Rs 400 crore through IPO