Share Market Closing : गुंतवणूकदारांना दिलासा, शेअर बाजारात पुन्हा तेजी; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : गुंतवणूकदारांना दिलासा, शेअर बाजारात पुन्हा तेजी; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

Share Market Closing : शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली, मात्र दिवसभरातील व्यवहारात शेअर बाजाराने तेजी घेतली. बाजार बंद होण्याच्यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत बंद झाले आहेत.

आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 242.83 अंकांनी वधारला आणि 0.40 टक्क्यांनी वाढून 61275 पातळीवर बंद झाला. याशिवाय NSE चा निफ्टी 86 अंकांनी वर चढून 18015 च्या पातळीवर बंद झाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती :

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग तेजीसह बंद झाले आणि 10 समभागांनी घसरण नोंदवली. निफ्टीच्या 50 पैकी 37 समभाग आज हिरव्या चिन्हात जोरदार बंद झाले आहेत आणि 13 समभागांमध्ये घसरणीचा लाल चिन्ह वर्चस्व आहे.

BSE India

BSE India

निफ्टीमधील टॉप गेनर्समध्ये TECH MAH 5.6% वाढीसह बंद झाला. याशिवाय अपोलो हॉस्पिटल आणि एस्कॉर्ट्स मोटच्या शेअर्समध्ये 5% पर्यंत तेजी दिसून आली. तर HUL आणि SUN PHARMA चे समभाग 1-1% ने घसरले.

'या' शेअर्समध्ये तेजी :

आज एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. आजच्या वाढत्या क्षेत्रांवर नजर टाकली तर बँक, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, मीडिया, मेटल, पीएसयू बँक आणि खाजगी बँक यांचे समभाग हिरव्या चिन्हात बंद झाले. ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, रियल्टी आणि तेल आणि वायू समभागांमध्ये आज वाढ झाली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

मात्र, आज पॉवर, एफएमसीजी आणि युटिलिटी शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही आज वाढीसह बंद झाले. या तेजीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 1.32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.