Share Market Closing : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; 'या' शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Closing : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Closing : सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजारात प्रॉफिट-बुकिंग दिसून आली, त्यामुळे त्यात घट झाली आहे.

बाजार पाच पैकी तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरणीसह बंद झाला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 435 अंकांनी घसरला आणि 60,000 च्या खाली 59,901 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127 अंकांच्या घसरणीसह 17,864 अंकांवर बंद झाला.

BSE India

BSE India

बाजारातील एफएमसीजी, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा क्षेत्रातील समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रांचे समभाग घसरले आहेत.

बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, मीडिया, इन्फ्रा क्षेत्राशी संबंधित समभाग घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील समभागही घसरले.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 5 समभाग वाढीसह बंद झाले तर 25 घसरले. 50 निफ्टी समभागांपैकी फक्त 10 समभाग वाढले तर 40 समभाग लाल रंगात बंद झाले.

सकाळी भारतीय शेअर बाजार किंचित वाढीसह उघडला. BSE सेन्सेक्स 35 अंकांनी वाढून 60,388 वर तर NSE निफ्टीने 16 अंकांच्या वाढीसह 18008 अंकांवर व्यवहार सुरू केला होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

TCS 3 टक्क्यांनी घसरला. बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस 2.76 टक्के, इंडसइंड बँक 2.57 टक्के आणि टेक महिंद्रा 2.47 टक्क्यांनी घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरून 82.72 वर बंद झाला. पुढील आठवड्यात बजाज फायनान्स (BAJFINANCE), बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV), आयसीआयसीआय बँक (ICICIBANK), इन्फोसिस (INFY),टायटन (TITAN) या शेअर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते.

हेही वाचा: SBI-HDFC-ICICI बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी नवीन नियम; RBI ने जारी केला आदेश

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.