Share Market Closing :आयटी, बँकीग अन् फार्माचे शेअर्स वधारले, गुंतवणूकदारांची कोट्यवधींची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

Share Market Closing :आयटी, बँकीग अन् फार्माचे शेअर्स वधारले, गुंतवणूकदारांची कोट्यवधींची कमाई

या आठवड्यात शेअर बाजार तेजीत सुरू झाला. सोमवारी बाजार तेजीसह बंद झाला होता तर आजही शेअर बाजार सुरवातीच्या सत्रात तेजीत सुरू झाला. दिवसभराच्या तेजी घसरणीमध्ये अखेर बाजार तेजीत बंद झाला.

सेन्सेक्स  361 अंकाच्या तेजीसह 60,927 वर बंद झाला तर निफ्टी 117 अंकाच्या तेजीसह 18,132 वर बंद झाला. आज 40 शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 9 शेअर्स खाली गेले. (share market closing news update 27 December 2022)

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 318 अंकांच्या तेजीसह 60,884 वर उघडला तर निफ्टी 92 अंकांच्या वाढीसह 18,107 वर उघडला आहे. आज सुरवतीच्या सत्रात 32 शेअर्स तेजीत होते. रिलायन्स, टाटा मोटर्स शेअर्स आघाडीवर दिसून आले

हेही वाचा: Best Stock :10 रुपयांचा शेअर पोहोचला 3300 रुपयांवर, गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेना

या शेअर्समध्ये तेजी : TATASTEEL, TATAMOTORS, WIPRO, BAJAJ-AUTO, ICICIBANK, TITAN, RELIANCE, MARUTI, AXISBANK, TCS, CIPLA

या शेअर्समध्ये घसरण : SUNPHARMA, HDFCLIFE, SBILIFE, BRITANNIA, APOLLOHOSP, HINDUNILVR

हेही वाचा: Stock Market : केवळ 2 वर्षात 'या' स्टॉकने एका लाखाचे केले एक कोटी

सोमवारी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आणि बाजार तेजीसह बंद झाला. फार्मा वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांत चांगली खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 721.13 अंकांनी अर्थात 1.20 टक्क्यांनी वाढून 60,566.42 वर बंद झाला. 

गेल्या आठवड्यात जोरदार विक्रीनंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये मजबूत सुधारणा दिसून आल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले. त्यामुळेच सलग 3 आठवड्यांच्या घसरणीनंतर सोमवारी बाजाराने रिकव्हरी दाखवली.