शेअर बाजारात अस्थिरता; सेन्सेक्स, निफ्टीत घसरण कायम

शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकातून दिसून येत आहे.
Share Market News
Share Market NewsSakal

गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकातून दिसून येत आहे. आज सुरवातीच्या सत्रातील घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 153 अंकानी घसरुन 52,693 वर बंद झाला तर निफ्टीतही 42 अंकाची घसरण होत 15.732वर बंद झाला.

आज शेअर बाजार सुरवातीच्या सत्रातही घसरणीसह सुरु झाला. सेन्सेक्स 350अंकांनी घसरून 52,495 वर सुरु झाला होता तर निफ्टी15,700 सुरु झाला होता.

Share Market News
अंबानीपासून मस्कपर्यंत टॉप-10 उद्योगपतींना अब्जावधींचा फटका

सोमवारी सेन्सेक्स, निफ्टी 2.5 टक्क्यांनी घसरले. बँक निफ्टीही 3 टक्क्यांहून अधिक घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही कपात झाली.

सोमवारी फेड बैठकीपूर्वी बाजारात विक्री दिसून आली. बीएसईच्या सर्व सेआक्टर इंडेक्समध्ये घसरण झाली. आयटी, मेटल, बँकिंग शेअर्सची जोरदार विक्री झाली आहे. रियल्टी, ऑटो, फार्मा शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. ऊर्जा, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्सवरही दबाव होता.

Share Market News
LPG Cylinder : आता 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार; भाजप सरकारची मोठी घोषणा

सोमवारी सेन्सेक्स 1,457 अंकांनी घसरून 52847 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 427 अंकांनी घसरून 15774 वर बंद झाला. निफ्टीचे 50 पैकी 48 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market News
सामान्यांना झटका! मे महिन्यात घाऊक महागाई विक्रमी उच्चांकावर

सोमवारी बाजारात मोठी घसरण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजारातील चौफेर घसरणीमुळे सेन्सेक्स-निफ्टी त्यांच्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली घसरले. महागाईच्या चिंतेनं मध्यवर्ती बँका आता अधिक व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे वाढ आणि मार्जिनवर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com