शेअर बाजारात तेजी कायम; सेन्सेक्स 1500 अंकानी वधारला

आज शेअर मार्केटमध्ये पहिल्या सत्रापासूनच तेजी दिसून आली.
Share Market Update | Stock Market Tips
Share Market Update | Stock Market Tipssakal

आठवड्यातील शेवटच्या दिवशी आज शेअर मार्केटमध्ये पहिल्या सत्रापासूनच तेजी दिसून आली. शेअर मार्केट आज तेजीसह उघडला आणि तेजीसह बंद झाला. आज शेअर बाजाराच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 1500 अंकाच्या तेजीसह 54300 वर बंद झाला तर निफ्टी 450 अंकाच्या तेजीसह 16200 वर बंद झाला. (share market closing update 20 may 2022)

आज पहिल्या सत्रापासून शेअर बाजार तेजीत आहे. सेन्सेक्स 980 अंकांनी अर्थात 1.85 टक्क्यांच्या तेजीसह 53,500 वर सुरू झाला होता तर निफ्टी 290 अंकांच्या तेजीसह 16,000 सुरू झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतीय बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला होता. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1416.30 अंकांनी अर्थात 2.61 टक्क्यांनी घसरून 52,792.23 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 430.90 अंकांनी म्हणजेच 2.65 टक्क्यांनी घसरून 15,809.40 वर बंद झाला होता. BSE सेन्सेक्स आणि निफ्टीने इंट्राडे मध्ये 52669.51 आणि 15775.20 च्या इंट्राडे नीचांकाला स्पर्श केला होता.

गुरुवारच्या घसरणीत एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 658257.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईचे मार्केट कॅप 18 मे रोजी 25577445.81 कोटींवरून 24919188.05 कोटी रुपयांवर घसरले.

युएस रिटेल कंपन्यांच्या अलीकडील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महागाईच्या उच्च दराचा कंपन्यांच्या व्यवसायावर खराब परिणाम होत आहे असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील किरकोळ विक्रेते टार्गेट कॉर्पचे शेअर्स इंधन आणि मालवाहतुकीतील वाढीमुळे 26 टक्क्यांहून अधिक घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com