शेअर बाजाराची लोळण

Share-Market
Share-Market

मुंबई - जागतिक शेअर बाजारांतील पडझडीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराने सोमवारी लोळण घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ५३६ अंशांनी कोसळला. मागील सात महिन्यांत एकाच दिवसांत झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. 

बॅंकिंग आणि वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आज मोठा फटका बसला. सेन्सेक्‍समध्ये आज ५३६ अंश म्हणजेच १.४६ टक्के घसरण 
होऊन तो ३६ हजार ३०५ अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची मागील सात महिन्यांतील एकाच दिवसात झालेली सर्वांत मोठी घसरण आहे. याआधी ६ फेब्रुवारीला निर्देशांकात ५६१ अंशांची घसरण झाली होती. याचबरोबर निर्देशांकाची ११ जुलैनंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक ३६ हजार २६५ अंशांवर बंद झाला होता. सलग पाच सत्रांमध्ये निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज ११ हजार अंशांच्या पातळीखाली घसरला. निफ्टीत आज १६८ अंश म्हणजेच १.५१ टक्के घसरण होऊन तो १० हजार ९६७ अंशांवर बंद झाला.

पाच सत्रांत ८.४८ लाख कोटींचा फटका 
मागील सलग पाच सत्रांत सेन्सेक्‍समध्ये १ हजार ७८५ अंश म्हणजेच पाच टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना ८.४८ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 

घसरणीची कारणे 
  खनिज तेलाचा भाव चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर 
  डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन 
  अमेरिकेशी व्यापार चर्चा चीनकडून रद्द 
  आयएल ॲण्ड एफएसचे कर्ज संकट

गृह आणि बिगर बॅंकिंग वित्त संस्थांच्या चिंताजनक आर्थिक स्थितीचा परिणाम शेअर बाजारावर झाला. सरकार आणि इतर संस्थांकडून आश्‍वासक माहिती देण्यात आली, तरी त्याने गुंतवणूकदारांचे समाधान झाले नाही. चिंताजनक आर्थिक स्थितीचा फटका शेअर बाजाराला बसला. 
- विनोद नायर, संशोधनप्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com