Share Market | शेअर बाजारात तेजी! सलग चौथ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market
आज कोणचत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल #esakalnews #shares #sharemarket #stock #Sensex #Nifty #Marathinews

शेअर बाजारात तेजी! सलग चौथ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

शेअर बाजारात (Share Market) सलग चौथ्या दिवशी बुधवारी तेजीत राहिला. दिग्गजांसह मिडकॅप-शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली. सेन्सेक्सने (Sensex) जवळपास 550 अंकांची उसळी घेतली. निफ्टीनेही (Nifty)150 अंकांची वाढ दर्शवली. सेन्सेक्स 533 अंकांनी वाढून 61,150 वर बंद झाला. निफ्टी 157 अंकांनी वाढून 18,212 वर बंद झाला. निफ्टी बँक 285 अंकांनी वाढून 38,728 वर बंद झाला. मिडकॅप (Midcap) 391 अंकांनी वाढून 31,792 वर बंद झाला.

तांत्रिक दृष्टीकोन

निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आणि गेल्या 53 व्यापार सत्रातील सर्वोच्च पातळीवर बंद झाला. निफ्टीला 18,300-18,400 पर्यंत जाण्यासाठी 18181 च्या वरच राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. आता निफ्टीचा सपोर्ट झोन 18,081 आणि 18,000 कडे सरकला आहे.

हेही वाचा: तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करतील 'हे' 6 मिडकॅप शेअर्स!

Share Market updates

Share Market updates

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मार्केट 18200 वर बंद झाले. आता त्याचे पुढील लक्ष्य 18,400 आणि 18,500 असल्याचे दीनदयाल इन्व्हेस्टमेंटचे मनीष हथिरामानी म्हणाले. इंट्राडेमध्ये काही करेक्शन असल्यास, व्यापाऱ्यांनी मोठ्या लक्ष्यासाठी खरेदी करावी असा सल्ला त्यांनी दिला.

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांवरून 8 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता वाढल्याचे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. याचे श्रेय प्रायवेट कॅपेक्स सायकल तेजीला दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले. आता सर्वांच्या नजरा आता इंडस्ट्रियल आणि रिटेल इन्फ्लेशन आकडेवारीवर आहेत. निफ्टीला 18,400 वर प्रतिकार दिसतो. त्याला 18,000 वर भक्कम सपोर्ट आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीसाठी 39,000 वर रेझिस्टंस आणि 38,400 वर सपोर्ट आहे.

हेही वाचा: Stock to Buy: ऑटो आणि फार्मा क्षेत्रातले मजबूत शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

share market

share market

आजचे टॉप 10 शेअर्स ?

- महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)

- भारती एअरटेल (BHARTIARTL)

- इंडसइंड बँक (INDUSINDBK)

- रिलायन्स (RELIANCE)

- हिंदालको (HINDALCO)

- आयडिया (IDEA)

- महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स (M&MFIN)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

- बाटा इंडिया (BATAIND)

- यूनायटेड ब्रुअरीज (UBL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top