आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
Share Market updates
Share Market updatesFile Photo
Summary

निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आहे

शुक्रवारी शेअर बाजार (Share Market) फ्लॅट बंद जायचे दिसून आले. जागतिक बाजारातील संकेत, यूएस पीपीआय डेटा आणि यूएसमधील जॉबलेस क्लेममधील वाढ यामुळे शुक्रवारी बाजाराची सुरुवात कमजोर झाली. यासोबतच, कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि यूएनकडून भारताच्या जीडीपी वाढीचा घसरणीचा परिणाम बाजारावर सुरुवातीच्या व्यापारात दिसून आला. (Today's Share Market Updates)

Share Market updates
तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करतील 'हे' 6 मिडकॅप शेअर्स!
Share Market
Share Marketsakal media

सेन्सेक्स (Sensex) शुक्रवारी 195 अंकांनी 61,040.32 च्या पातळीवर उघडला. दिवसाच्या पहिल्या सहामाहीत सेंटिमेंट नकारात्मक राहिले आणि सेन्सेक्स इंट्राडेमध्ये 478 अंकांनी घसरून 60,757.03 वर पोहोचला पण दुपारच्या जेवणानंतर नीचांकी पातळीपासून 568 अंकांनी झेप घेतली. 61,324.59 चा इंट्राडे उच्चांक आणि व्यवहाराच्या शेवटी 12.2 अंकांनी घसरून 61,223 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी (Nifty) 72.8 अंकांच्या घसरणीसह 18,185 वर उघडला. इंट्राडे मध्ये, तो 138.15 अंकांनी घसरून 18,119.65 च्या नीचांकी पातळीवर आला. दुपारनंतर 167.3 अंकांनी वाढून 18,286.95 च्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला. व्यवहाराच्या शेवटी 2.05 अंकांच्या घसरणीसह 18,255.75 वर बंद झाला.

Share Market updates
Stock to Buy: ऑटो आणि फार्मा क्षेत्रातले मजबूत शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Share Market
Share Marketesakal

निफ्टी (Nifty) शुक्रवारी घसरणीसह उघडला. ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीच्या सहामाहीत कांसोलिडेशन (Consolidation) दिसून आल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. निफ्टीने (Nifty)त्याच्या शेवटच्या 5 ट्रेडिंग दिवसातील हायर लोज फॉर्मेशन नाकारले पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या फेरीत चांगली रिकव्हरी दिसल्याचे तापडिया म्हणाले. निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आहे आणि गेल्या 6 व्यापार सत्रातील हायर हाईज तयार करत असल्याचे चंदन तापडिया म्हणाले. तर विकली फ्रेमवरही बुलिश कँडल तयार केली आहे आणि गेल्या 3 आठवड्यांपासून ती तेजीत आहे. आता निफ्टीला 18,081 च्या वर राहून 18,400 कडे जावे लागेल तर खाली 18,181 आणि 18000 झोनकडे जावे लागेल असेही ते म्हणाले.

शुक्रवारी दिवसभर बाजारात अस्थिरता दिसून आली आणि शेवटी तो फ्लॅट बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात कमजोर झाली. मात्र, बाजारात चांगली रिकव्हरी झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले.

Share Market updates
शेअर बाजारात तेजीची हॅटट्रिक! आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
share market
share marketsakal media

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- टाटा कंझ्युमर्स (TATACOMSUME)

- इंडियन ऑईल कॉर्परेशनन (IOC)

- टीसीएस (TCS)

- इन्फोसिस (INDOSYS)

- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)

- आयआरसीटीसी (IRCTC)

- हिन्दुस्थान ऐअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

- वोल्टास (VOLTAS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com