शेअरमधील पडझड कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई - जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचा भारतीय शेअर बाजारांना फटका बसला. सलग दुसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स २७५ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १९९.८० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६.१५ अंशांच्या घसरणीसह १० हजार ५६२.३५ अंशांवर बंद झाला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतल्याने निर्देशांकांना झळ बसल्याचे शेअर दलालांनी म्हटले आहे.  कच्च्या तेलाच्या किंमतींतील घसरण कायम आहे. कच्च्या तेलाचा भाव १३ महिन्यांचा नीचांकावर आल्याने अमेरिकन शेअर बाजारांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील शेअर घसरले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Decrease