शेअर बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी घसरले

वृत्तसंस्था
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार एलटीजीसी कराचे परिणाम भविष्यातही दिसतील. आशिया खंडातील इतर शेअर बाजारातही आज घसरण पहायला मिळाली आहे. जपान, हाँगकाँगमध्येही बाजार कोसळले आहेत.

मुंबई : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात घसरण कायम असून, आज (सोमवार) बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टीमध्ये घसरण पहायला मिळाली.

केंद्रीय अर्थसंकल्पात गुंतवणूकदारांवर कर जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. त्यानंतर सलग तीन दिवसांमध्ये शेअर बाजारात घसरण बघायला मिळते आहे. आज सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स 450 अंशांनी आणि निफ्टी 120 अंशांनी कोसळला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सेन्सेक्स 34608 अंशांवर आणि 10600 अंशापर्यंत गेला होता.

शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार एलटीजीसी कराचे परिणाम भविष्यातही दिसतील. आशिया खंडातील इतर शेअर बाजारातही आज घसरण पहायला मिळाली आहे. जपान, हाँगकाँगमध्येही बाजार कोसळले आहेत.

Web Title: share market down by 450 points