शेअर बाजारातील तेजी कायम

पीटीआय
गुरुवार, 10 मे 2018

मुंबई - शेअर बाजारातील तेजी सलग तिसऱ्या सत्रात बुधवारी सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १०३ अंशांनी वधारून ३५ हजार ३१९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३ अंशांनी वाढून १० हजार ७४१ अंशांवर बंद झाला. 

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर आज दिसून आला. आज सकाळी सेन्सेक्‍समध्ये काही प्रमाणात घसरण झाली. नंतर या परिस्थितीत सुधारणा होऊन सेन्सेक्‍स १०३ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ३१९ अंशांवर बंद झाला.

Web Title: share market fast