शेअर बाजारात तेजीचे वातावरण…

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍सने मंगळवारी अखेर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून झेप घेतली. निर्देशांक 195 अंशांनी वधारून 25 हजार 960 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही आठ हजार अंशांची पातळी ओलांडली. निफ्टी 73 अंशांची वाढ होऊन 8 हजार 19 अंशांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्‍स 26 हजार 39 या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर गेला. मात्र, त्यानंतर नफेखोरी सुरू झाल्यामुळे त्यात घसरण झाली. अखेर तो कालच्या तुलनेत 195 अंश म्हणजेच 0.76 टक्के वाढून 25 हजार 960 अंशांवर बंद झाला. मागील सहा सत्रांत निर्देशांकात 1 हजार 752 अंशांची घसरण झाली आहे. आज झालेल्या वाढीमुळे सेन्सेक्‍समधील घसरण अखेर थांबली आहे. निफ्टीही आज 8 हजार 19 अंश या उच्चांकी पातळीवर गेला होता. त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण झाली. कालच्या तुलनेत 73 अंश म्हणजेच 0.92 टक्के वाढ होऊन निफ्टी 8 हजार 2 अंशांवर बंद झाला.

Web Title: share market goes bullion