शेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३३१ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १४४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०० अंशांची वाढ होऊन १० हजार ५८२ अंशांवर बंद झाला. 

ऊर्जा, बॅंकिंग आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. त्याशिवाय परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढवल्याने निर्देशांकांतील तेजीला बळ मिळाल्याचे शेअर दलालांनी सांगितले. याआधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये ४२५ अंशांची घसरण झाली होती. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार सोमवारी (ता.१२) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात ८३२ कोटींची खरेदी केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार ७३ कोटींचे समभाग खरेदी केले. 

आज आयसीआयसीआय बॅंकेच्या समभागामध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल एनटीपीसी २.३६ टक्‍क्‍यांनी वधारला. खनिज तेलाचा भाव कमी झाल्याने तेल वितरक कंपन्यांच्या समभागांना आज मोठी मागणी होती.

आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष मिटण्याची शक्‍यता कमी असल्याने परकी गुंतवणूकदारांनी आशियातील बाजारांमधून पैसे काढण्याला भर दिला. जपानच्या निक्केई निर्देशांकात दोन टक्के घसरण झाली. कोरिया, तैवान, हॅंगसेंग, शांघाई आदी शेअर बाजारांमधील निर्देशांकातही घसरण नोंदवण्यात आली.

Web Title: Share market Increase