शेअर बाजारात तेजीचा चौकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मार्च 2019

मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी किरकोळ पाच अंशांनी वधारून ११ हजार ५८ अंशांवर बंद झाला. 

सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्‍स वधारला असून, त्यात ८५८ अंशांची वाढ झाली आहे. आजच्या सत्रात एल अँड टीच्या समभागामध्ये सर्वाधिक वाढ झाली. महिंद्रा अँड महिंद्रा, ॲक्‍सिस बॅंक, आयटीसी, एसबीआय, एचडीएफसी, पॉवरग्रीड, टाटा मोटर्स, टाटा स्टील, रिलायन्स आदी समभाग वधारले. मात्र, कोल इंडिया, एनटीपीसी, सन फार्मा, ओएनजीसी, येस बॅंक आदी समभाग घसरणीसह बंद झाले. ‘ईसीबी’, ‘फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘बॅंक ऑफ जपान’ या जगातील प्रमुख बॅंकांच्या बैठका होणार आहेत. या बैठकांमधून काय निर्णय होईल, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. 

भांडवली वस्तू, एफएमसीजी, दूरसंचार आदी क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात आज तेजी दिसून आली. आरोग्यसुविधा, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान, बांधकाम, तेल व नैसर्गिक वायू आदी क्षेत्रांतील कंपन्याच्या समभागात घसरण झाली. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. 

रुपयाची आगेकूच सुरूच 
भांडवली बाजाराबरोबर चलन बाजारातदेखील तेजीचे सत्र कायम आहे. चलन बाजारात गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयात २८ पैशांची वाढ झाली. रुपया ७० च्या पातळीवर बंद झाला. मागील तीन सत्रांत तो ९२ पैशांनी वधारला आहे. काल (ता. ६) रुपया डॉलरसमोर २१ पैशांनी मजबूत झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market Increase