Share MarketUpdates : शेअर बाजार तेजीसह सुरु; सेन्सेक्स 418 तर निफ्टी 126 अंकांनी वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Today's Stock Market News | Share Market Updates
Share Market: शेअर बाजार तेजीसह सुरु; सेन्सेक्स 418 तर निफ्टी 126 अंकांनी वधारला

Share Market: शेअर बाजार तेजीसह सुरु; सेन्सेक्स 418 तर निफ्टी 126 अंकांनी वधारला

Share Market Live Updates : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर काल शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. हाच सूर शेअर बाजाराने कायम राखला. आज सकाळी शेअर बाजार वाढीसह सुरु झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वधारले. सेन्सेक्स 418.97 अंकांच्या वाढीसह 54,671.50 वर सुरु झाला. तर निफ्टी 126.45 अंकांनी वधारून 16,296.60 वर सुरु झाला.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्स 201 तर निफ्टी 79 अंकांच्या वाढीसह सुरु

निफ्टी 50 मधील 41 शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली, तर 9 शेअर्समध्ये घसरण झाली. इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, हिंदाल्को, इंडसलँड बँक हे शेअर्स आजच्या दिवसाच्या सुरुवातीला वाढीसह सुरु झाली, तर ओएनजीसी, अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी, पावरग्रिड, ब्रिटानिया हे शेअर्स घसरणीसह सुरु झाले.

हेही वाचा: 'या' शेअरचा एका वर्षात 200 टक्के परतावा, आता खरेदी करणं फायद्याचं ठरेल का?

तत्पूर्वी काल सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार हिरव्या चिन्ह्यात बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दिवसअखेर चांगली वाढ झाली. सेन्सेक्स 503.27 म्हणजेच 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 54252.53 वर बंद झाला, तर निफ्टी 144.35 अंकांच्या म्हणजेच 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 16170.15वर बंद झाला.

Web Title: Share Market Latest Update Today Sensex And Nifty Opening Status 27th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top