Share Market Opening : दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; 'या' बँकांच्या शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : दोन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; 'या' बँकांच्या शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening : आज दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 61257 वर, निफ्टी 90 अंकांच्या वाढीसह 18288 वर आणि बँक निफ्टी 246 अंकांच्या वाढीसह 42865 अंकांवर उघडला.

सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 62300 च्या वर आहे, तर निफ्टी 18275 च्या वर व्यवहार करत आहे. भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एचसीएल, इन्फोसिस आणि टाटा स्टील या समभागांमध्ये वाढ झाली आहे. एनटीपीसी, एलटी, मारुती आणि अॅक्सिस बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

BSE India

BSE India

सध्या निफ्टीच्या 50 पैकी 31 समभाग तेजीसह तर 18 समभाग तेजीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सच्या आजच्या वाढत्या समभागांच्या नावावर नजर टाकली तर सन फार्मा 1.74 टक्क्यांच्या तेजीमध्ये आहेत.

भारती एअरटेल 1.24 टक्क्यांनी, एचसीएल टेक 0.75 टक्क्यांनी आणि कोटक बँक 0.7 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. इन्फोसिस 0.58 टक्के आणि आयटीसी 0.51 टक्क्यांनी वर आहे. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा यांचे शेअर्सही तेजीत आहेत.

हेही वाचा: Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलचे नवे मालक ठरले; 'या' कंपनीने जिंकला लिलाव

वॉल स्ट्रीटच्या वाढीनंतर आशियाई शेअर बाजाराने तेजी दाखवण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या सत्रात अमेरिकी शेअर बाजारातील तेजीमुळे आशियाई शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दिसून आली.

त्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारातही तेजीची नोंद झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 82.80 वर उघडला. मागील सत्रात तो 82.81 च्या पातळीवर बंद झाला होता.

शेअर बाजारासाठी असे बोलले जात आहे की चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे जागतिक भावना खराब आहेत, ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे. कोरोनाची साथ पसरली तर साहजिकच त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या परिस्थितीमुळे डायग्नोस्टिक फार्मा कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत.