Share Market Opening : शेअर बाजारात पुन्हा तेजी; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

आशियाई शेअर बाजारांमध्ये वाढीचे चांगले संकेत दिल्यानंतर भारतीय बाजार तेजीने उघडला.
Share Market
Share MarketSakal

Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या तेजीसह व्यापार सुरू झाला आहे. आशियाई शेअर बाजारांमध्ये वाढीचे चांगले संकेत दिल्यानंतर भारतीय बाजार तेजीने उघडला.

BSE सेन्सेक्स 420 अंकांच्या उसळीसह 60350 वर उघडला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 111 अंकांच्या उसळीसह 17,721 अंकांवर उघडला.

आजच्या व्यवहारात, बँकिंग, ऑटो, पीएसयू बँक, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रातील समभाग वाढले आहेत तर आयटी, फार्मा, धातू, ऊर्जा, तेल आणि वायू आणि हेल्थकेअरचे समभाग खाली आहेत.

BSE India
BSE IndiaSakal

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभाग वाढीसह आणि 9 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा : ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले

अदानी एंटरप्रायझेसचा समभाग 10 टक्क्यांनी घसरला आणि 52 आठवड्यांचा नवा नीचांक गाठला. अदानी पोर्ट्समध्येही 10 टक्क्यांनी लोअर सर्किट आहे. आज ITC, SBI, BoB, Tata Power या कंपन्यांचे निकाल येतील.

Share Market
Gautam Adani : गौतम अदानींना मोठा झटका! आता टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतूनही झाली हकालपट्टी

'या' समभागांमध्ये तेजी :

सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक 5.03 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे टायटनमध्ये 4.58 टक्के, बजाज फायनान्समध्ये 2,12 टक्के, एसबीआयमध्ये 1.81 टक्के, आयसीआयसीआय बँकेत 1.51 टक्के आणि बजाज फिनसर्व्हमध्ये 1.50 टक्के मिळून व्यवसाय करत होते.

त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्समध्ये हिरव्या चिन्हासह व्यवहार होत होते.

'या' समभागांमध्ये घसरण :

सुरुवातीच्या व्यापारात पॉवरग्रीड 0.82 टक्क्यांच्या कमाल घसरणीसह व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग लाल रंगात व्यवहार करत होते.

आज 'या' कंपन्यांचे तिमाही निकाल होणार जाहीर :

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, इंडिगो, बँक ऑफ बडोदा, डिव्हिस लॅब्स या प्रमुख कंपन्यांचे आर्थिक निकाल शुक्रवारी येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com