Share Market Opening : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Opening : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

Share Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात आज लाल चिन्हासह व्यवहार सुरू झाला आहे. काल अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत असून अदानी समूहाचे शेअर्सही आज मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

आज बाजाराच्या सुरुवातीस, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 60,706.81 वर उघडला आणि एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी आज 17,847.55 वर उघडला. सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.

BSE India

BSE India

सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 10 समभाग तेजीत आहेत आणि 20 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. 50 निफ्टी समभागांपैकी केवळ 15 समभाग वाढीच्या हिरव्या चिन्हासह आणि 35 समभाग घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.

मीडिया आणि PSU बँका वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरत आहेत. PSU बँका 1 टक्‍क्‍यांहून अधिक आणि मीडिया शेअर्स 0.23 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

घसरणीच्या क्षेत्रात, 1.13 टक्के धातूचे समभाग घसरले आहेत, तर आयटी समभागांमध्ये 1.08 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. फार्मा शेअर्समध्ये 0.72 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. तेल आणि वायू 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

'या' शेअर्समध्ये तेजी :

आज, सेन्सेक्सच्या वाढत्या समभागांमध्ये, L&T, SBI, PowerGrid, Bajaj Finance, UltraTech Cement, Bajaj Finserv, M&M आणि मारुती हे तेजीसह व्यवहार करत आहेत.

या' शेअर्समध्ये घसरण :

एचडीएफसी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, टायटन, आयटीसी, नेस्ले, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि एशियन पेंट्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, सन फार्मा, टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो, रिलायन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एचसीएल टेक शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अदानी समूहाचे शेअर्स :

आज बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाचे सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहेत. अदानी एंटरप्रायझेसमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार या कंपन्यांचे शेअर्स 5-5 टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी एंटरप्रायझेसमध्ये 10 टक्क्यांनी लोअर सर्किट आहे.