Share Market: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 311, तर निफ्टी 70 अंकांनी वधारला

आजही शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिलं आहे.
कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....
कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....Sakal

तब्बल 6 दिवसांच्या सलग घसरणीनंतर अखेर सोमवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. आजही शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात सुरु झाले. सेन्सेक्स 311.35 अंकांच्या वाढीसह 53,285.19वर सुरु झाला, तर निफ्टी 70.3 अंकाच्या वाढीसह 15,912.60 वर सुरु झाला. दरम्यान आज बहुप्रतिक्षित एलआयसी शेअर्सचे लिस्टींग झालं. मात्र शेअर बाजारात एलआसीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. एलआयसीचा शेअर्स 12 टक्क्यांच्या घसरणीसह सुरु झाला.

कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....
Share Market: शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स 180 तर निफ्टी 60 अंकांनी वधारला

आयटी आणि एफएमसीजी वगळता सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 180.22 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52,973.84 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 60.15 अंकांच्या अर्थात 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 15,842.30 वर बंद झाला.

सोमवारी व्यवहारात शेअर बाजाराला ऑटो आणि बँक शेअर्सचा पाठिंबा मिळाला. मात्र, वाढत्या महागाईची भीती आणि त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम याचा बाजारावर मोठा परिणाम दिसला. पहिल्या तिमाहीत आणि चालू आर्थिक वर्षाचे चांगले निकाल येण्याची शक्यता असलेल्या अशा कंपन्यांकडे बाजारपेठेची नजर आहे. वाढत्या स्पर्धेमुळे डायग्नोस्टिक आणि पॅथॉलॉजी स्टॉकमध्ये चौथ्या तिमाहीच्या निकालापूर्वी नफा-वसुली झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com