Share Market: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

आज शेअर बाजार घसरणीसह सुरु झालाय.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market News sakal

Today's Share Market Updates: मागील आठवड्यापासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यातही शेअर बाजार घसरणीसह सुरु झाला. सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती तर आजही ही घसरण कायम आहे. आज शेअर बाजार घसरणीसह सुरु झालाय.

सेन्सेक्स 350अंकांनी घसरून 52,495 वर सुरु झाला, तर निफ्टी15,700 सुरु झाला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरणीचे चित्र आहे.

Share Market Latest Updates | Stock Market News
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

सोमवारी सेन्सेक्स, निफ्टी 2.5 टक्क्यांनी घसरले. बँक निफ्टीही 3 टक्क्यांहून अधिक घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही कपात झाली.

सोमवारी फेड बैठकीपूर्वी बाजारात विक्री दिसून आली. बीएसईच्या सर्व सेआक्टर इंडेक्समध्ये घसरण झाली. आयटी, मेटल, बँकिंग शेअर्सची जोरदार विक्री झाली आहे. रियल्टी, ऑटो, फार्मा शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. ऊर्जा, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्सवरही दबाव होता.

सोमवारी सेन्सेक्स 1,457 अंकांनी घसरून 52847 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 427 अंकांनी घसरून 15774 वर बंद झाला. निफ्टीचे 50 पैकी 48 शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Share Market Latest Updates | Stock Market News
वारसा हक्काने मिळालेली प्रॉपर्टी विकल्यावर टॅक्स भरावा लागेल का?

सोमवारी बाजारात मोठी घसरण झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बाजारातील चौफेर घसरणीमुळे सेन्सेक्स-निफ्टी त्यांच्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली घसरले. महागाईच्या चिंतेनं मध्यवर्ती बँका आता अधिक व्याजदर वाढवू शकतात, ज्यामुळे वाढ आणि मार्जिनवर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.

Share Market Latest Updates | Stock Market News
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)

टाटा मोटर्स (TATAMOTORS)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

हिन्दाल्को (HINDALCO)

एल अँड टी (LTTS)

एम फॅसिस (MPHASIS)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

टाटा पॉवर (TATAPOWER)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com