Share Market: आजही शेअर बाजारात अस्थिरता; सेन्सेक्स, निफ्टीत किंचीत घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market: आजही शेअर बाजारात अस्थिरता; सेन्सेक्स, निफ्टीत किंचीत घसरण

Share Market: आजही शेअर बाजारात अस्थिरता; सेन्सेक्स, निफ्टीत किंचीत घसरण

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे. आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सावधपणे झाली आहे. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सपाट झाली. बाजार आजही अस्थिर राहण्याची शक्यता आहे. सेन्सेक्समध्ये आज किंचीत घसरण दिसून आली. बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 23 अंकांनी घसरत 57,403 अंकावर आणि निफ्टी 8 अंकांनी वधारत 17,102 अंकांवर खुला झाला आहे. सकाळी 9.30 वाजता शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 173 अंकांच्या घसरणीसह 57,253.84 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 43 अंकांच्या घसरणीसह 17,050.60 अंकांवर व्यवहार करत होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स ते 5.9 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयचे धोरण जाहीर झाल्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या मोठ्या विक्रीनंतर, निफ्टीने 16800 च्या जवळ सपोर्ट घेतला आणि बाऊंसबॅक केल्याचे कोटक सिक्युरीटीजचे अमोल आठवले म्हणाले. निर्देशांकाने डेली चार्टवर एक लाँग बुलिश कॅडल तयार केली. त्याने विकली चार्टवर हॅमर कॅंडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे जे सकारात्मक संकेत आहेत.

हेही वाचा: बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
आयडीएफसी फर्स्ट बँक ()
ज्युबिलंट फुडवर्क्स लिमिटेड (JUBLFOOD)
डिक्सन (DIXON)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ऍस्ट्रल (ASTRAL)