Share Market: सलग दोन दिवसाच्या तेजीला ब्रेक, शेअर बाजारात घसरण

आज सुरवातीच्या सत्रातच शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली
Todays Share Market News
Todays Share Market Newssakal

Todays Share Market News: घसरणीला ब्रेक लावत या आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. मात्र आज सुरवातीच्या सत्रातच शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स 378 अंकाच्या घसरणीसह 52,153 वर सुरू झाला तर निफ्टी 126 अंकाच्या घसरणीसह 15,512 वर सुरू झाला. सलग दोन दिवसाच्या तेजीला आज ब्रेक लागला तरीसुद्धा दिवसभरातील शेअर बाजारातील स्थिती कशी राहील, हे पाहणे गरजेचे आहे.

मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली होती. मेटल आणि आयटी शेअर्स मध्ये सर्वाधिक वाढ झाली. सेन्सेक्स 934.23 अंकांच्या म्हणजेच 1.81 टक्क्यांच्या वाढीसह 52,532.07 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 288.65 अंकांच्या म्हणजेच 1.88 टक्क्यांच्या वाढीसह 15638.80 वर बंद झाला.

भारतात विक्रीचे कोणतेही संकेत नसल्याने शिवाय वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्यामुळे बाजारात रिकव्हरी झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराने महागाई आणि कडक आर्थिक धोरणाशी संबंधित अनिश्चिततेवर मात केल्याचेही ही रिकव्हरी सांगते असे ते म्हणाले. पण बाजार अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे. त्यामुळे अशा वेळी अगदी लहान नकारात्मक ट्रिगरही बाजारात उलथापालथ घडवून आणू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टायटन (TITAN)
हिन्दाल्को (HINDALCO)
कोल इंडिया (COALINDIA)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
ऍस्ट्रल (ASTRAL)
टाटा पॉवर (TATAPOWER)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com