दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम

आज शेअर बाजार हलक्या तेजीसह सुरू झाला
Todays Share Market News
Todays Share Market Newssakal

आठवड्याच्या पहिल्या दिवस वगळता शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. मात्र आज शेअर बाजार हलक्या तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स 200 अंकाच्या तेजीसह 53,250 वर उघडला तर निफ्टी 49 अंकाच्या तेजीसह 15,850 वर उघडला.

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 150.48 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी घसरून 53,026.97 वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी 51.10 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांनी घसरून 15,799.10 वर बंद झाला. (pre analysis of share market 30 june 2022)

Todays Share Market News
सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जून सिरीज एक्स्पायरीपूर्वी शेअर बाजारात दबाव दिसून आला. सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. गुरुवारच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव होता, तर मेटल, रियल्टी शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली. दुसरीकडे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीचा दबदबा राहिला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.70 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप 0.18 टक्क्यांनी घसरला आहे.

Todays Share Market News
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
ओएनजीसी (ONGC)
एनटीपीसी (NTPC)
रिलायन्स (RELIANCE)
सनफार्मा (SUNPHARMA)
कोल इंडिया (COALINDIA)
ट्रेंट (TRENT)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पेज इंडिया (PAGEIND)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com