Share Market : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 276 अंकांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Updates

Share Market : घसरणीला ब्रेक, शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स 276 अंकांवर

शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरत असल्याचे चित्र दिसून आले आहे. भारतीय शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहे. तर आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. आज सुरवतीच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांच्या तेजीसह 59,080 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी 82 अंकांच्या तेजीसह 17,629 अंकांवर खुला झाला आहे

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली होती. तर शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 36 अंकांची वाढ झाली होती. सेन्सेक्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.02 टक्क्यांची घट होऊन तो 17,539 अंकांवर स्थिरावला होता.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सध्या निफ्टी 17450-17700 च्या रेंजमध्ये व्यवहार करत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. 20-दिवसीय SMA (सिंपल मूव्हिंग अॅव्हरेज) आणि 17450 हे आता ट्रेडर्ससाठी महत्त्वाचे सपोर्ट झोन असतील तर 17700 ची पातळी निफ्टीसाठी रझिस्टंस म्हणून दिसू शकते.

17700 च्या ब्रेकआउटनंतर वरची वाटचाल शक्य आहे. याच्या वर निफ्टी 17900-18000 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17450 च्या खाली गेल्यास तो 17250-17150 च्या पातळीवर सरकला जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात वोलेटाईल ऍक्शननंतर, निफ्टीने विकली चार्टवर नेगिटिव्ह क्लोज पोस्ट केल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. गेल्या 2-3 आठवड्यांतील प्राईस ऍक्शनमधून लक्षात येते की इंडेक्स शॉर्ट टर्म में कंसोलिडेशन फेजमध्ये आहे. हे सध्या क्रुशियल फॉलिंग ट्रेंडलाइनच्या खाली साइडवे एक्शन दाखवत आहे.