Pharma Share : तज्ज्ञांचे फेव्हरेट स्टॉक्स शॉर्ट टर्ममध्ये देतील तगडी कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pharma Share  : तज्ज्ञांचे फेव्हरेट स्टॉक्स शॉर्ट टर्ममध्ये देतील तगडी कमाई

Pharma Share : तज्ज्ञांचे फेव्हरेट स्टॉक्स शॉर्ट टर्ममध्ये देतील तगडी कमाई

Share Market : शेअर बाजाराच्या अस्थिरतेतही आयटी आणि फार्मा सेक्टरमध्ये खरेदी दिसून येत आहे. बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट एक्सपर्ट आणि सेठी फिनमार्टच्या विकास सेठीने कॅश मार्केटमध्ये दोन शेअर्सवर बाय रेटींग दिली आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

सगळ्यात पहिल्या शेअरसाठी त्यांनी इन्फ्रा क्षेत्रातील कंपनी एनसीसीची (NCC) निवड केली आहे. शेअरचे शॉर्ट टर्म टारगेट 77 रुपये आणि स्टॉप लॉस 66 रुपये आहे. ही भारतातील आघाडीची इन्फ्रा कंपनी आहे. कंपनीची बॅलेन्सशीट खूप चांगली आहे. कंपनीकडे 40000 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. त्याच वेळी, कंपनीला सतत नवीन ऑर्डर मिळत असतात.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

एनसीसीचे (NCC) अनेक रोड टोल प्रकल्प आहेत. FASTag अनिवार्य केल्याने कंपनीला खूप फायदा झाला आहे. जून तिमाहीत कंपनीचा प्रॉफीट आफ्टर टॅक्स 134 कोटी होता. रस्ते आणि पायाभूत सुविधांवरही सरकारचे लक्ष आहे. अशा स्थितीत कंपनीला येत्या काही दिवसांत आणखी फायदे मिळणार आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेअर्सचे व्हॅल्युएशन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स 509 घसरला

दुसऱ्या शेअरसाठी विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधूनच गोकलदास एक्सपोर्ट्सची (Gokaldas Exports) निवड केला आहे. ही देशातील आघाडीची वस्त्र निर्यात करणारी कंपनी आहे. कंपनीचे 80 टक्के उत्पन्न निर्यातीतून येते. कंपनीच्या मोठ्या क्लायंटबद्दल बोलायचे तर यात GAP, H&M, MARKS & SPENCER, WALMART सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

हेही वाचा: Share Market : या 2 स्टॉक्समध्ये मिळेल बंपर रिटर्न, तज्ज्ञांचा सल्ला

65 टक्के विक्री अमेरिकेत होते. याशिवाय वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यावरही सरकारचा भर आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच क्यूआयपी केले होते, त्यानंतर कर्ज भरले होते. सध्याच्या घसरणीमुळे स्टॉक चांगल्या किंमतीवर मिळत आहे. स्टॉकचे शॉर्ट टर्म टारगेट 370 रुपये आणि स्टॉप लॉस 345 रुपयेआहे.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजार पडझड सुरूच, सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

टॅग्स :Share Market