शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी जाणून घ्या आजचे टॉप 10 परफॉर्म करु शकणारे शेअर्स कोणते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest Updates | Stock Market News
शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी जाणून घ्या आजचे टॉप 10 परफॉर्म करु शकणारे शेअर्स कोणते?

शेअर बाजार सुरु होण्यापुर्वी जाणून घ्या आजचे टॉप 10 परफॉर्म करु शकणारे शेअर्स कोणते?

Share Market: आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर बुधवारी बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. गुरुवारी सकाळच्या व्यवहारात आशियाई बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली. पण, शेवटी जगभरातील सर्वच बाजारांचा नफा कमी होऊन सपाट बंद झाल्याचे दिसून आले.

भारतीय बाजारही त्याला अपवाद नव्हता. सकाळी जोरदार सुरुवात झाल्यानंतर हळूहळू तो दबावाखाली येऊ लागला आणि दुपारच्या जेवणानंतरच्या ट्रेडिंग सत्रात बाजारावर नफावसुलीचे (Profit Booking) वर्चस्व राहिले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 33.20 अंकांच्या अर्थात 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 55,702.23 वर बंद झाला. निफ्टी 5.05 अंकांच्या अर्थात 0.03 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 16,682.65 वर बंद झाला.

हेही वाचा: या' शेअर्सचा 1 वर्षात 350% परतावा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

आज कशी शेअर बाजाराची स्थिती?

रिऍल्टी, फार्मा आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये नफावसुली (Profit Booking) झाल्यामुळे सुरुवातीचा नफा गमावल्यानंतर बाजार गुरुवारी सपाट बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार रिस्क घेत नसल्याचे दिसून आले. याशिवाय एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार सेकंडरी मार्केटमध्ये आपली पोझिशन हलकी करताना दिसतात. त्यामुळे बाजारावरही दबाव निर्माण झाला.

मोठ्या घसरणीनंतर, निफ्टीने इनसाइड बियरिश कँडल तयार केली आणि इंट्राडे चार्टवर लोअर टॉप बॉटम होल्ड केला आहे. जे सध्याच्या पातळीपासून आणखी कमजोरी दाखवत आहे. जोपर्यंत निफ्टी 16,850 च्या खाली राहील तोपर्यंत त्याची घसरण सुरूच राहील आणि निफ्टी 16,600-16,500 च्या खाली जाताना पाहू शकतो. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16,800 आणि 16,850 स्तरांवर रझिस्टंस आहे. हा रझिस्टंस तुटला की, निफ्टी 16850- 16,950 च्या दिशेने जाऊ शकतो.

हेही वाचा: Mutual Fund: 7 लार्ज कॅप म्युच्युअल फंड; दोन वर्षांत 118-126 टक्क्यांचा तगडा परतावा

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

टेक महिन्द्रा (TECHM)

हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)

इन्फोसिस (INFOSYS)

एचसीएल टेक (HCLTEC)

टाटा स्टील (TATASTEEL)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

ब्रिटानिया (BRITANNIA)

सनफार्मा (SUNPHARMA)

टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

नेसले इंडिया (NESTLEIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Pre Analysis Best Stock To Buy Today Ss01

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top