शेअर बाजारातील तेजी कायम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयानंतर शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी किरकोळ 63 अंशांनी वाढून 29 हजार 648 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंशांनी वधारून 9 हजार 160 अंशांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयानंतर शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स शुक्रवारी किरकोळ 63 अंशांनी वाढून 29 हजार 648 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंशांनी वधारून 9 हजार 160 अंशांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) समितीने जुलैपासून "जीएसटी' लागू होईल, असे म्हटल्याने शेअर बाजारात आज (शुक्रवार) खरेदीवर जोर दिसून आला. निफ्टीने आज 9 हजार 200 अंशांची ऐतिहासिक पातळी ओलांडत 9 हजार 218 अंशांची उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण झाली. अखेर कालच्या तुलनेत निफ्टी 6 अंशांनी वधारुन 9 हजार 160 अंशांवर बंद झाला. काल निफ्टी 9 हजार 153 अंशांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला होता. "जीएसटी'चा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यतेने सिगारेट कंपन्यांच्या समभागात आज चांगली वाढ झाली. या आठवड्यात सेन्सेक्‍समध्ये 702 अंश म्हणजेच 2.42 टक्के आणि निफ्टीत 225 अंश म्हणजेच 2.52 टक्के वाढ झाली आहे. दोन्ही निर्देशांकांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Share Market in rapid speed