शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण कायम आहे. शनिवारी होणाऱ्या निवडणुक निकालांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सची नकारात्मक सुरुवात झाली आहे. निफ्टीदेखील नकारात्मक परंतु 8900 अंशांच्या पार व्यवहार करत आहे. सध्या(10 वाजून 5 मिनिटे) सेन्सेक्स 6.38 अंशांच्या किरकोळ घसरणीसह 28,895.56 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,919.40 पातळीवर व्यवहार करत असून 4.90 अंशांनी घसरला आहे.

बाजारात ऑटो, बँकिंग, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. याऊलट, कॅपिटल गूड्स, हेल्थकेअर, आयटी, मेटल्स, ऑईल अँड गॅस आणि पीएसयू क्षेत्रात घसरणीसह व्यवहार सुरू आहे.

निफ्टीवर एशियन पेंट्स, एसीसी, झी एन्टरटेनमेंट, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर डॉ. रेड्डीज् लॅब्स, गेल, भारती इन्फ्राटेल, विप्रो आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स कोसळले आहेत.

Web Title: share market second day down