शेअर बाजारातील तेजीला विराम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी तिढा सुटण्याची शक्‍यता धूसर झाल्याचे पडसाद आज जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटले. गुंतवणूकदारांनी बांधकाम, भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सेवा आदी क्षेत्रातील शेअर्सची जोरदार विक्री केली. यामुळे सेन्सेक्‍स ७३ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १०३.१४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३८.४० अंशांची घट झाली. निफ्टी १० हजार ६७९.६५ वर बंद झाला. सलग चार सत्रांनंतर सेन्सेक्‍समधील तेजीला विराम मिळाला. 

बीजिंगमध्ये आज अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक सुरू झाली. मात्र सध्या सुरू असलेल्या व्यापार असहकारावर तोडगा निघण्याची शक्‍यता कमी असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली.

विमान कंपन्यांचे शेअर जमिनीवर
इंटरग्लोब एव्हीएशनच्या खराब कामगिरीचा फटका विमान कंपन्यांच्या शेअर्सला बसला. मार्चच्या तिमाहीत इंटरग्लोबच्या नफ्यात ७३ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. यामुळे निराश गुंतवणूकदारांनी विमान कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री केली. इंटरग्लोबचा शेअर २० टक्‍क्‍यांनी आपटला. जेट एअरवेजच्या शेअरमध्ये १२.२८ टक्‍क्‍यांची घट होऊन तो ५२०.१० रुपयांवर बंद झाला. स्पाईस जेटच्या शेअरमध्ये ६.१४ टक्‍क्‍यांची घट झाली आणि तो १२३.८० रुपयांवर बंद झाला.

Web Title: share market stop