Share Market Tips : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Tips : गुरुवारी विकली एक्सपायरी दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 142.43 अंकांच्या अर्थात 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 60806.22 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 21.80 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढत . 17893.50 वर बंद झाला. गुरुवारच्या व्यवहारात सुमारे 1670 शेअर्सची वाढ झाली. तर 1714 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर 142 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

डेली चार्टवर निफ्टी त्याच्या 21 इएमएवर बंद झाला आहे जे शॉर्ट टर्मसाठीचा सकारात्मक संकेत असल्याचे सॅमको सिक्युरिटीजचे रोहन पाटील म्हणाले.

तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टी 18000 च्या नियर टर्म रझिस्टंस ओलांडताना पाहू शकतो. खाली त्याचा पहिला सपोर्ट 17650 वर आहे. जर निफ्टी 18000 च्या वर बंद झाला तर त्यात 18200 - 18250 पातळी दिसू शकते.

कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारही सपाट राहिल्याचे फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. एफआयआयची विक्रीमुळे बाजारावर परिणाम होत आहे, पण देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बाजाराला काही प्रमाणात सपोर्ट मिळत आहे.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर एक डोजी कॅंडलस्टिक तयार केली आहे, जी मार्केटमध्ये दिशा नसल्याचा संकेत देते. आता ट्रेडर्सना 17800 वर सपोर्ट दिसत आहे. तर, 17950 वर रझिस्टन्स दिसत आहे.

जर निफ्टीने 17950 चा हा रझिस्टन्स पार केला तर तो 18000-18100 च्या पातळीजवळ जाताना दिसेल. दुसरीकडे, जर निफ्टी 17800 च्या खाली घसरला तर ही कमजोरी 17650-17600 पर्यंत वाढलेली दिसून येईल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • ट्रेंट (TRENT)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एल अँड टी सर्व्हिसेस (LTTS)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.