Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

Share Market Tips : मंगळवारी बाजारात शॉर्ट कव्हरिंग पाहायला मिळाले. सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 61032 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 159 अंकांनी वाढून 17930 वर बंद झाला. निफ्टी बँक 41600 च्या पुढे बंद झाली आहे.

बँक निफ्टी 366 अंकांनी वाढून 41648 वर बंद झाली. आयटी, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. त्याचबरोबर रियल्टी, ऑटो आणि फार्मा शेअर्समध्ये दबाव दिसून आला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप 84 अंकांनी घसरून 30482 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात वाढीने झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी, तो दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला.

डेली चार्ट पाहता निफ्टी 17850-17900 च्या पहिल्या रझिस्टंसच्या वर बंद झाल्याचे स्पष्ट होते.आवर्ली बोलिंजर बँडचा विस्तार दिसून येत आहे, जे बाजारातील अस्थिरता वाढण्याचे लक्षण आहे.

डेली मोमेंटम इंडिकेटर पॉझिटिव्ह क्रॉसओवर दाखवत आहे, जो तेजीची कायम राहण्याचे सूचित करतो. अशा परिस्थितीत, प्राइस आणि मोमेंटम या दोन्हीचे इंडिकेटर निफ्टीमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत देत आहेत. लवकरच निफ्टी 18,100 च्या पातळीला स्पर्श करताना दिसेल.

चांगली सुरुवात केल्यानंतर दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसा निफ्टीने वेग पकडल्याचे सॅमको सिक्युरिटीजचे रोहन पाटील यांनी सांगितले. 17880 जवळील इंट्राडे रझिस्टंस पार केल्यानंतर, तेजीचे आणखी वाढली.

निफ्टी त्याच्या 9 ट्रेडिंग सत्राच्या उच्चांकावर बंद झाला. त्याच कंसोलिडेशन ब्रेकआउट दिसून आला. आता निफ्टीसाठी 18000-18050 जवळ एक मोठा रझिस्टंस आहे.

निफ्टीने हा रझिस्टंस पार केल्यास आणखी तेजी येईल. तर खाली 17800 - 17650 वर सपोर्ट दिसत आहे. हा सपोर्ट तुटल्यास निफ्टी 17500 पर्यंत खाली जाऊ शकतो.

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • आयटीसी (ITC)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETR)

  • ट्रेंट (TRENT)

  • डिक्सन (DIXON)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.