शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सलग तिसऱ्या दिवशी Sensex अन् Nifty डाउन

गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे चित्र आहे.
Todays Share Market Updates
Todays Share Market Updatessakal

Todays Share Market Updates: गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरणीचे चित्र आहे. त्यामुळे याचा नकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. आजही शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 60 अंकाच्या घसरणीसह 52, 625 वर सुरू झाला तर निफ्टी 30 अंकाच्या घसरणीसह 15,710 वर सुरू झाला. आज बाजारात अस्थिरता दिसून येईल असा अंदाज तंज्ञानी व्यक्त केलाय.

शेअर बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीवर बंद झाला. सेन्सेक्स 153 आणि निफ्टी 42 अंकांनी घसरून बंद झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ऑटो, एनर्जी, बँकिंग शेअर्सवर दबाव दिसला, तर मेटल, रियल्टी, फार्मा शेअर्समध्ये हलकी खरेदी झाली.(Stock Market Updates)

सेन्सेक्स 153 अंकांनी घसरून 52694 वर बंद झाला, तर निफ्टी 42 अंकांनी घसरून 15732 वर बंद झाला. निफ्टी बँक 95 अंकांनी घसरून 33311 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 62 अंकांनी घसरला आणि 26716 वर बंद झाला.

युएस फेडचा (US FED) निर्णय बुधवारी बाजाराची दिशा ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे FitchMotilal Oswal चे सिद्धार्थ खेमका म्हणाले. जगभरातील वाढती महागाई, चीनमधील नवे निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे बाजारावर सध्या दबाव राहील. देशांतर्गत आघाडीवर, FII ची सतत विक्री आणि रुपयाच्या कमजोरीमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम होईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ऑरोफार्मा (AUROPHARMA)
ए यू बँक (AUBANK)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
एल अँड टी (LTTS)
एलटीपीसी लिमिटेड (NTPC)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
डिवीस लॅब (DIVISLAB)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
सिप्ला (CIPLA)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com