शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे वारे 

टीम ईसकाळ
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घसरण 

मुंबई: जागतिक पातळीवर सुरु असलेल्या नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. अमेरिकेने ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांदरम्यान नव्याने लागू करण्यात येणाऱ्या आयातकर शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर आशिया आणि युरोपीय शेअर बाजारात घसरण झाली. परिणामी, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 126 अंशांनी घसरून 40 हजार 675 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 54 अंशांची घसरण झाली. तो 11 हजार 994 अंशांवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर पुन्हा एकदा व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाल्याने धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्याच्या द्विमाही पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्र घेतल्याने बँकिंग शेअरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. येस बँकेच्या शेअरमध्ये 7.57 टक्क्यांची घसरण  झाली. मुंबई शेअर बाजारात वेदांता, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, इन्फ्राटेल, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर टीसीएस, इन्फोसिस, बजाज ऑटो, कोटक बँकेचे शेअर तेजीत होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market update: Bank shares slip YES Bank dips 2 per cent