आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड, चमक दाखवू शकणाऱ्या 10 शेअर्सवर नजर टाकुया

मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा यांनी बँक निफ्टी मध्येही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे
Share Market
Share MarketSakal

मंगळवारी 2 दिवसांनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 776 अंकांनी वाढला, निफ्टी 17200 च्या पातळीवर बंद झाला, बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी 246.85 अंकांच्या अर्थात 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 17,200.80 वर बंद झाला.

मंगळवारी ऑटो, रियल्टी, एफएमसीजी सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, पीएसई शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली.

Share Market
...अखेर एलॉन मस्क बनले Twitterचे मालक

मंगळवारी शेअर बाजारात मंगलमय वातावरण दिसून आल्याचे मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा म्हणाल्या. निफ्टी मध्ये 17172 च्या पातळीवर खरेदी करायला हवी असे मत त्यांनी नोंदवले. यात 17250 ची पातळीही दिसू शकते, सोबतच 17000 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा यांनी बँक निफ्टी मध्येही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात 36585 वर खरेदी करू शकता असे त्या म्हणाल्या. पण 36250 वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Share Market
LIC IPO 'या' तारखेला लॉंच होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

हिरो मोटोकॉर्प (HEROMOTOCO)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

टायटन (TITAN)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

पेज इंडिया (PAGEIND)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com