
भारतीय भांडवली बाजारात विक्रमी वाढ झाली आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 45 हजार अंशांच्या वर गेला आहे.
मुंबई: आज RBI ने मॉनिटरी पॉलिसीची घोषणा केली आहे. यामध्ये व्याजदरात कोणतेही बदल झाले नाहीत. याचा परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारात विक्रमी वाढ झाली आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 45 हजार अंशांच्या वर गेला आहे.
मॉनेटरी पॉलिसीची घोषणा करताना आरबीआयच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात Q3 आणि Q4 मध्ये वेगवान वाढ अपेक्षित आहे, जो 2021 मध्ये रिअल जीडीपी -7.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्राच्या सुरुवातीला सकाळी 11 वाजता सेन्सेक्समध्ये 390 अंशांची वाढ झाली आहे.
Sensex at 44,946.20, up by 313.55 points as Reserve Bank of India announces Monetary Policy statement; keeps repo rate unchanged at 4 per cent pic.twitter.com/0waq4B4kug
— ANI (@ANI) December 4, 2020
निफ्टीतही सत्राच्या सुरुवातीला 70 अंशांची वाढ होऊन निफ्टीचा निर्दशांक 13,206.70 अंशांवर गेला आहे. निफ्टीत आतापर्यंत 0.59 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने ऑक्टोबरमध्ये व्याजदरात बदल केला नाही. मॉनेटरी पॉलिसीची घोषणा करताना आरबीआयच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात Q3 आणि Q4 मध्ये वेगवान वाढ अपेक्षित आहे, जो 2021 मध्ये रिअल जीडीपी -7.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.