
100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ऑटोमोबाइल्सच्या शेअरचा तगडा परतावा
शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या दरम्यान काही ब्रोकरेज हाऊसने चांगल्या शेअर्सची लिस्ट दिली आहे. त्यात सगळ्यात वरच्या स्थानी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मदरसन सुमी वायरिंग इंडिया (Motherson Sumi Wiring India) हा शेअर आहे.
ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी ऑटो कंपोनंट कंपनी मदरसन सुमी वायरिंगचा आऊटलूक पाहता बाय रेटिंग दिले आहे. कंपनीला ऑटोमधील ईव्ही आणि इतर मेगाट्रेंडचा फायदा होईल. मदरसन सुमी सिस्टीम्सच्या डिमर्जरनंतर मार्च 2022 मध्ये मदरसन सुमी वायरिंग स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाला. तेव्हा हा शेअर बीएसईवर 66 रुपयांवर लिस्ट झाला होता.
हेही वाचा: PIB फॅक्ट चेक : 15000 रुपये अन् सरकारी नोकरी; जाणून घ्या, संपूर्ण सत्य?
33% वाढ अपेक्षित
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ऑटो उद्योगातील मेगाट्रेंड लक्षात घेऊन वायरिंग हार्नेस कंपनी मदरसन सुमी वायरिंगच्या शेअर्सचे कव्हरेज सुरू केले आहे. मोतीलाल ओसवाल स्टॉकवर खरेदी मत अर्थात बाय रेटींग दिले आहे. तसेच 80 रुपये टारगेट देण्यात आले आहे. 17 जून 2022 च्या ट्रेडिंग सत्रात हा स्टॉक 60 रुपयांपर्यंत खाली आला. म्हणजेच या स्टॉकमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा 33 टक्क्यांहून अधिक वाढ दिसू शकतो.
मदरसन सुमी वायरिंग (MSUMI) ही भारतातील वायरिंग हार्नेस उद्योगातील बाजारपेठेतील दिग्गज कंपनी असल्याचे मोतीलाल ओसवाल म्हणाले. हा सुमितोमो वायरिंग सिस्टम आणि मदरसन ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) आहे.
हेही वाचा: 22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली
कंपनीचा मार्केट शेअर 40 टक्क्यांहून अधिक आहे. कंपनीची नफा मजबूत आहे. उद्योगात सर्वाधिक ग्रॉस एबिटडा मार्जिन आहे. मदरसन सुमी सिस्टीम्सच्या (MSS) रिस्ट्रक्चरिंगनंतर ही पुर्णतः भारतातील देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणारी वायरिंग हार्नेस कंपनी बनली आहे. देशांतर्गत रिस्ट्रक्चरिंग व्यवसायातून कंपनीचा रेव्हेन्यू 95 टक्क्यांहून अधिक आहे.
या शेअरचे मूल्यांकन चांगले असल्याचा ब्रोकरेजला विश्वास आहे. कारण, कंपनीची कॉम्पिटेटिव्ह पोझिशन मजबूत आहे. कंपनीकडे पुरेसे भांडवल आहे. ऑटो क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहने आणि इतर मेगा ट्रेंड कंपनीला खूप फायदेशीर ठरतील.
हेही वाचा: Gold-silver Price: सोने-चांदीच्या दरात घसरण, पहा 10 ग्रॅमचा आजचा भाव
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Of This Automobile Which Is Cheaper Than 100 Rs Will Give Strong Return
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..