LIC च्या शेअर्सने गुंतवणुकदारांना केलं निराश, आता काय करावे?

एलआयसीच्या (LIC) शेअर्समधील सततच्या घसरणीनं गुंतवणुकदारांची चांगलीच निराशा केली आहे.
LIC Stock
LIC Stock Sakal

Share Market Investment Tips: एलआयसीच्या (LIC) शेअर्समधील सततच्या घसरणीनं गुंतवणुकदारांची चांगलीच निराशा केली आहे. लिस्ट झाल्यापासून सतत घसरत आहेत. बुधवारी हा शेअर 2.18 टक्क्यांनी घसरून 736.55 रुपयांवर बंद झाला. इश्यू प्राइस किमतीच्या तुलनेत आता हा शेअर 22 टक्क्यांनी घसरला आहे. हा स्टॉक बीएसई आणि एनएसईवर 17 मे रोजी लिस्ट झाला होता. तेव्हापासून त्यात घसरण सुरूच आहे.

मंगळवारीही या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. तो 3 टक्क्यांनी घसरून 752 रुपयांवर आला होता. यामुळे त्याचे बाजार भांडवलही 4.76 लाख कोटींवर घसरले. सरकारने मोठ्या अपेक्षेने LIP चा IPO आणला होता. पण, घसरणीने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

LIC Stock
'हा' डिफेन्स शेअर येत्या वर्षात देईल दमदार परतावा

एलआयसीने गुंतवणूकदारांना 949 रुपये दराने शेअर जारी केले होते. तर पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना हे शेअर्स सवलतीत जारी केले गेले. या सवलतीमुळे, पॉलिसीधारकांनी या IPO मध्ये जोरदार बोली लावली होती. पॉलिसीधारकांचे कोट 6 वेळा सबस्क्राइब केले गेले. त्याला प्रति शेअर 69 रुपये सूट मिळाली.

काही तज्ज्ञांनी या स्टॉकची किंमत 700 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की स्टॉकला इश्यू प्राइसच्यावर जाण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. कंपनीने गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्चच्या नफ्यात 17.41 टक्क्यांनी घट झाली. याचा परिणाम शेअरवरही झाला आहे. झटपट नफ्यासाठी एलआयसीच्या आयपीओमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली खरी पण आता ते जास्त चिंतेत आहेत. येत्या काळात गुंतवणुकदार तोटा सहन करुन हे शेअर्स विकतील असा अंदाज आहे.

LIC Stock
50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

सरकारने एलआयसीमधील केवळ 3.5 टक्के हिस्सा विकला आहे. मात्र, पुढील काही वर्षांत त्यांना कंपनीतील हिस्सा आणखी कमी करावा लागेल. सेबीच्या नियमांनुसार, कंपनीमध्ये 25 टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग आवश्यक आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com