Cash Market चे 'हे' दोन स्टॉक्स बजेटनंतर घेतील भरारी! शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

तुम्ही या दोन्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता असा सल्ला सेठी यांनी दिला आहे.

Cash Market चे 'हे' दोन स्टॉक्स बजेटनंतर घेतील भरारी!

Stocks to Buy : शेअर बाजार (Share Market) तज्ज्ञ विकास सेठी यांनी शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी दोन मजबूत स्टॉक्स (Stocks) निवडले आहेत. हे दोन्ही स्टॉक कॅश मार्केटचे (Cash Market) आहेत आणि शॉर्ट टर्ममध्ये चांगला परतावा (Refund) देऊ शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दोन्ही शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता असा सल्ला सेठी यांनी दिला आहे. सेठी यांनी त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine) आणि इंडियन बँकेची (Indian Bank) निवड केली आहे.

हेही वाचा: सॉलिड फंडामेंटल्स असणारे 2 स्टॉक्स, तज्ज्ञांचे फेव्हरिट!

त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine)

त्रिवेणी टर्बाइन ही त्रिवेणी इंजीनिअरिंग ग्रुपची कंपनी आहे. यामध्ये त्रिवेणी इंजिनिअरिंगचा वाटा 21-22 टक्के आहे. त्रिवेणी टर्बाइन पॉवर इक्विपमेंट आणि सॉल्यूशन्सशी संबंधित व्यवसाय करते. देशातील स्टीम टर्बाइन उद्योगात त्याचा वाटा 60 टक्के आहे. त्याच वेळी, ते 70 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करतात. FII आणि DII ची कंपनीत जवळपास 27 टक्के हिस्सेदारी आहे.

कंपनीचे फंडामेंटल्स ?

कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय ठोस आहेत. त्याचा कॅपिटल एम्प्लॉयड रिटर्न (ROCE) सुमारे 22.50 टक्के आहे तर रिटर्न ऑन इक्विटी (RoE) 16 टक्के आहे. विशेष म्हणजे त्यावर कोणतेही कर्ज नाही. त्याच वेळी, त्याचा PE (Price earnings ratio) मल्टिपल 23 आहे. विकास सेठी यांनी हा शेअर शॉर्ट टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पानंतरही हा स्टॉक चांगली कामगिरी करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

त्रिवेणी टर्बाइन (Triveni Turbine)

- सीएमपी (CMP) - 195.30 रुपये

- टारगेट (Target) - 205/210 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss) - 185 रुपये

हेही वाचा: Cash Market मधील हे 2 स्टॉक्स देतील मजबूत परतावा!

इंडियन बँक (Indian Bank)

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठींनी दुसरा शेअर हा बँकिंग सेक्टरमधून निवडला आहे. त्यांनी इंडियन बँकेत (Indian Bank) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इंडियन बँक (Indian Bank) एक चांगल्या दर्जाची PSU बँक आहे. त्याचे तिमाही निकालही चांगले आले आहेत. सध्या हा शेअर स्वस्त व्हॅल्युएशनवर ट्रेडिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले. बँक निफ्टी आता सावरेल अशी आशा विकास सेठी यांनी व्यक्त केली. त्यानंतर हा शेअर चांगली कामगिरी करेल असे ते म्हणाले.

इंडियन बँक (Indian Bank)

- सीएमपी (CMP) - 147.40 रुपये

- टारगेट (Target) - 155 रुपये

- स्टॉप लॉस (Stop Loss)- 140 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top