दाखवा, कमी महागाई कशी आहे?- राजन

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - महागाई कमी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या टीकाकारांना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कशी महागाई कमी आहे, हे दाखविण्याचे आव्हान रविवारी दिले. विकासापेक्षा किमती कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. 

 

मुंबई - महागाई कमी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या टीकाकारांना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कशी महागाई कमी आहे, हे दाखविण्याचे आव्हान रविवारी दिले. विकासापेक्षा किमती कमी ठेवण्याला प्राधान्य असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले. 

 

सरकार आणि सरकारी धोरणांबाबत स्पष्टवक्ते म्हणून राजन ओळखले जातात. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""आर्थिक सुधारणांचा वेग हा निराशाजनक असून, सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ, कमकुवत जागतिक अर्थव्यवस्था आणि "ब्रेक्‍झिट‘सारखे बाह्य धक्के यांचा सुधारणांवर परिणाम होत आहे. सगळ्या मर्यादा असूनही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून, चांगला मॉन्सून; तसेच रचनात्मक सुधारणा, सूक्ष्म आर्थिक स्थैर्य यामुळे विकासाचा वेग आगामी काळात वाढेल.‘‘ 

 

राजन यांनी व्याजदरात कपात केली नाही, अशी टीका केली जाते. यावर बोलताना ते म्हणाले, ""किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ जूनमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढून 5.77 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. कोणत्याही आर्थिक आधाराशिवाय यावर चर्चा होताना दिसतो. मागील आठवड्यात किरकोळ चलनवाढ 5.8 टक्के होती; तर रेपो दर 6.5 टक्के आहे. याबाबत चर्चा करणाऱ्यांनी चलनवाढ कशी कमी आहे हे दाखवून द्यावे.‘‘ अशा प्रकारच्या टीकेकडे मी देत नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

 

""देशांतर्गत एकूण उत्पादनाचा (जीडीपी) आकडा बऱ्याच वेळा आधीपासून प्रस्तावित केलेला असतो. 7.6 आणि 8 टक्के हे दोन्ही आकडे जवळचे आहेत. आर्थिक समावेशकतेचे धोरण राबविताना प्रत्येक खेड्यात बॅंकेची शाखा काढणे व्यवहार्य नाही आणि ते परवडण्यासारखे नाही. त्यासाठी मोबाईल शाखा अथवा सूक्ष्म शाखा असे पर्याय रिझर्व्ह बॅंक पडताळून पाहत आहे,‘‘ असे त्यांनी सांगितले. 

 

लगेच पुस्तक लिहिणार नाही 

रघुराम राजन यांनी लगेच कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणारे पुस्तक लिहिण्याची योजना नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या आधीचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. सुब्बाराव यांनी पुस्तकात लिहिलेल्या मुद्‌द्‌यांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजन यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता होती. मात्र, राजन यांनी शैक्षणिक विषयावर पुस्तक लिहिण्यात रस असल्याचे बोलून दाखविले.

Web Title: Show, is how low inflation - Rajan

टॅग्स