गाडी घेताय? मग तुमचा खर्च वाढलाय....

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

वाहन उत्पादक संघटनेची नाराजी 
नवी दिल्ली: मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या वाहन उद्योगाला सावरण्याऐवजी अडचणीत आणण्याचे निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात असल्याने वाहन उत्पादकांच्या संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणी शुल्कात 10 ते 20 पटीने प्रचंड वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. दुचाकींसाठी एक हजार आणि मोटारींसाठी पाच हजारांपर्यंत नोंदणी शुल्क प्रस्तावित आहे. यामुळे वाहन उद्योगाची कोंडी वाढण्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच श्रेणीतील वाहन विक्री ठप्प आहे. कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. शिल्लक साठा प्रचंड वाढल्याने वितरक आणि विक्रेते हवालदील बनले आहे. आगामी सणासुदीत विक्री वाढण्याची अपेक्षा ठेवलेल्या कंपन्यांपुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या नोंदणीसाठी सध्याच्या एक हजारांऐवजी किमान 20 हजार रुपये शुल्क प्रस्तावित आहे. त्याशिवाय ट्रक आणि बस साठी 1 हजार 500 रुपयांऐवजी 20 हजारांचे शुल्क आणि दुचाकींसाठी एक हजार, मोटारींसाठी पाच हजार रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुचाकींसाठी केवळ 50 रुपये आणि मोटारींवर सध्या 600 रुपये नोंदणी शुल्क आहे. ही शुल्कवाढ बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण करेल. ज्यातून विक्रीवर मोठा परिणाम होईल, अशी भिती वाहन उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्सने व्यक्त केली आहे. यापूर्वी सरकारने दुचाकी आणि मोटारींवरील थर्डपार्टी इन्शुरन्सच्या विमा प्रिमियमध्ये 21 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SIAM Opposes Proposed Hike In Vehicle Registration Fees