चांदी 40 हजारांखाली 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई : स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी घसरण झाली. चांदीच्या भावात घट होऊन तो ४० हजार रुपयांच्या खाली आला. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅम ८० रुपयांची घसरण होऊन ३१ हजार १५० रुपयांवर आला. शुद्ध सोन्याचा भावही प्रतिदहा ग्रॅम ८० रुपयांची घसरण होऊन ३१ हजार ३०० रुपयांवर आला. चांदीच्या भावात प्रतिकिलो ७६० रुपयांची घट होऊन तो ३९ हजार २७० रुपयांवर आला. जागतिक पातळीवर डॉलरचा भाव वधारल्याने सोन्याच्या भावात सुरू असलेली घसरण आज थांबली. सोन्याचा भाव आज प्रतिऔंस १ हजार ३२६ डॉलरवर गेला. चांदीच्या भावातही वाढ होऊन तो प्रतिऔंस १६.६९ डॉलरवर पोचला. 

Web Title: Silver 40 thousand under

टॅग्स