esakal | Gold prices: चांदीचे दरात वाढ, सोने स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

silver rate increase

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव कमी झाला असून चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसले आहे.

Gold prices: चांदीचे दरात वाढ, सोने स्वस्त; जाणून घ्या आजच्या किंमती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव कमी झाला असून चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोन्याचे दर 75 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅममागे 51 हजार 69 रुपयांवर आले आहे. मात्र, दुसरीकडे चांदीचा भाव 121 रुपयांनी वाढला आहे. यामुळे चांदीचे प्रति किलोचे भाव 62 हजार 933 रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने प्रति औंस 1908 डॉलरवर गेले, तर चांदी प्रति औंस 24.72 डॉलर होती.

गुरुवारी सोने-चांदीचे दर घसरले होते-
सोने-चांदीच्या भावात गुरुवारी घसरण नोंदवण्यात आली होती. गुरुवारी सोन्याचा भाव 95 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅमला 51 हजार 405 रुपयांवर गेले होते आणि चांदीचे भाव 504 रुपयांनी कमी होऊन 63 हजार 425 रुपये प्रति किलो झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने 1918 डॉलर आणि चांदी 24.89 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसत होते. 
सणासुदीच्या काळात वाढण्याची मागणी

IRDAIने जारी केले health insuranceचे नवीन नियम; होतील अनेक फायदे

भारतात कोरोनामुळे 2020 ला जागतिक स्तराच्या किंमतीच्या तुलनेत 25 टक्क्यांची वाढ दिसली आहे. ऑगस्ट महिन्यात सोने, चांदीचे दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी किंमतीवर पोहचले होते. सणासुदीच्या काळात भारतात सोन्याची मागणी वाढेल आणि किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढतील अशी आशा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

भारताकडे सोन्याचा किती साठा आहे-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या  (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. 

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

loading image
go to top